मुंबई : दादरा नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी मुंबईत सोमवारी सी ग्रीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी दिला होता. याचा अहवाल आला आहे. श्वास बंद झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फॉरेंसिक रिपोर्ट हाती आल्यानंतर कशामुळे मृत्यू झाला आहे. याचे खरे कारण पुढे येणार आहे. मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस दलातील IPSअधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ते  उच्चस्तरीय संपर्कात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या का केली आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोटही याठिकाणी सापडली आहे. सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावे असल्याचे पुढे आले आहे. जवळपास 40 जणांची नावे आहेत. 


मोहन डेलकर यांनी आत्महत्या का केली याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आला असून श्वास बंद झाल्याचे म्हटले आहे. मात्र, फॉरेंसिक रिपोर्ट हाती येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे आलेले नाही. त्यानंतर खरे कारण पुढे येईल.  सुसाईट नोटमध्ये नेमकं कारण काय आहे. याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. मात्र, 40 जणांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे लोक कोण आहेत, त्यांची चौकशी होणार का, याची उत्सुकता आहे.


मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटबाबत तपास सध्या फॉरेन्सिक विभाग करीत आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार खासदार मोहन देलकर यांनी आत्महत्या केली. फॉरेन्सिक टीमने हॉटेलच्या खोलीत तपास केला.


दरम्यान, मोहन डेलकर (58) हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले.