मुंबई : आजकाल लोकांना नोकरी करुन पैसा अपुरा पडतो. तेव्हा लोक कोणत्या तरी दुसऱ्या INCOME SOURCE कडे वळतात पण बहुतेकदा लोकांकडे एखादा BUSINESS सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसतं आणि ते बॅकेकडून घ्यायचे झाले तरी अनेक अडचणींना सामोरं जाव लागतं. पण आता केंन्द्र सरकारने या गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुमचं हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या (Aatmanirbhar Bharat Mission) मिशनच्या माध्यमातून साकार होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज दिले जात आहे. या माध्यमातून सरकार बंद असलेला व्यवसायला सुद्ध पुन्हा उभ करण्याची संधी देत आहे. पण त्याआधी कोणता व्यवसाय तुमच्यासाठी उपयुक्त आहे हे ठरवावे लागेल.


घरातून आणि कमी खर्चात सुरु करता येतील अशा सात ऑनलाईन कामांबद्दल माहिती घेऊ यात


1- ब्रेड  बनविण्याचा व्यवसाय (Bread Making Business)
ब्रेड मेकिंग ची सुरुवात तुम्ही घरापासूनच करु शकता. तुम्ही ब्रेड बनवून ते बेकरी किंवा बाजारपेठेत सप्‍लाय करु शकता. हा सगळ्यात सोपा, कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत होणारा व्यवसाय आहे. लॉकडाऊननंतर ब्रेड खाणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे.


या व्यवसायासाठी  १०,००० रुपये खर्च येतो. ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर किंवा ईस्ट, ड्राई फ्रूट्स आणि मिल्क पावडर.


2- ब्‍लॉग पासून कमवा (Income from Blog)


जर तुमच्याकडे लिहिण्याचे कौशल्य असेल तर लॅपटॉप उचला आणि कामाला लागा, कारण तुम्ही ब्लॉगिंगमधूनही पैसे कमवू शकता. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर ब्लॉगिंग सुरु केलंत तर तुम्ही स्वत:ची वेबसाइटही तयार करु शकता. त्याच्या प्रमोशनसाठी खूप OPTION आहेत त्यामुळे काही महिन्यांतच तुम्ही कमवायला लागाल.


3- Youtube channel (Start Your Youtube Channel)
Youtube चॅनलच्या माध्यमातून मोठेच काय तर अगदी लहानलहान मुले सुद्धा कमवायला लागली आहेत.  रेयान (Ryan Kaji) या ९ वर्षांच्या मुलाने या माध्यमातून कोट्यवधीं रुपयांची कमाई केली आहे.  रेयान त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो आणि कोट्यवधी रुपये कमावतो. तुम्हीही यूट्यूबवर व्हिडिओ तयार करून भरपूर पैसे कमवू शकता फक्त तुम्ही सर्जनशील असले पाहिजे.


4- Advertisement बनवा
एडवरटाइज़िंग कॅम्पेन डेवलपर हा पूर्णपणे ऑनलाइन व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि मग वेबसाइट तयार करुन तुमच्या कामाची सुरुवात करावी लागेल. गुगलवर याचे शिक्षण देणाऱ्या अनेक वेबसाईट्स सापडतील. हे अभ्यासक्रम २१ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत असतात. त्यानंतर तुम्ही डिजिटल प्रमोशनशी कनेक्ट करु शकता.  आपला व्यवसायाची सुरुवात करु शकता.


5- Online Classes
तुम्ही हुशार असाल आणि एखाद्या विषयात तज्ञ असाल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरु करु शकता. बँक, SSC,CAKE मेकिंग, YOGA ते अगदी सिविल सर्विसची तयारी, हे सर्व ऑनलाईन केली जात आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे केवळ ऑनलाइन अभ्यासक्रमांमधून कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. सुरुवात करण्यासाठी याला फारसा खर्च ही येत नाही.