मुंबई : कडाक्याच्या उष्णतेमुळे अनेकांना उन्हाळा नकोसा झालाय. सर्वांचं लक्ष आता पावसाकडे लागलंय. कधी पाऊस येतोय आणि एकदाची या उष्णतेतून सुटका होतेय, असंच प्रत्येकाला वाटतंय. या दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. (monsoon update 2022 rainfall forecast for coming 4 weeks by india meteorological department)
 
पुढच्या आठवड्यात अंदमानात पाऊस दाखल होणार होणारं आहे. त्यामुळे पाऊस मे महिन्यातच दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हवामान खात्यानं मान्सूबाबत काय अंदाज वर्तवलाय पाहूयात.. 


आयएमडीचा येत्या 04 आठवड्यांत पावसाचा अंदाज


आठवडा 1: अंदमान समुद्रावर वर्धित पावसाची शक्यता.


आठवडा 2 आणि 3 :अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता दर्शवते.


दुसरा आठवडा आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.