India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल
India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे.
India News : इतिहासात (History) डोकावून पाहिलं, तर भारतात येणाऱ्या परदेशवासियांची संख्या मोठी होती ही बाब लगेचच लक्षात येते. व्यापार किंवा आणखी काही कारणांनी ही मंडळी भारतात आली. येथील (Indian Culture) संस्कृतीतून काही गोष्टी आत्मसात करत त्यांनी आपली छापही या देशात सोडली. काहींनी तर या देशावर तब्बल 150 वर्षे अधिपत्यही गाजवलं. काळ बदलला. पारतंत्र्यांच्या बंधनातून भारताची सुटका झाली आणि नवे दिवस उजाडले.
क्रांती होतच होती, नवनवीन गोष्टींचे शोध लागतच होते. देश पुढे जात होता. असं करता करता 21 वं शतक उजाडलं आणि चित्र काहीसं बदललं. कारण, सध्याच्या घडीला भारतातील नागरिकच परदेशाची वाट धरताना दिसत आहेत. 14 मार्च रोजी लोकसभेमध्ये यासंदर्भातील माहिती सादर करण्यात आली. जिथं, 3,73,434 भारतीयांचं Immigration Clearance जाहीर करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक आकडा पंजाबमधील नागरिकांचा होता.
2021 मध्ये 163,370 नागरिकांनी भारताचं नागरिकत्वं सोडलं. देश सोडण्यामागे त्यांनी खासगी कारणं असल्याचं स्पष्टही केलं. इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2021 मध्ये 300 नागरिकांनी चीनचं नागरिकत्वं स्वीकारलं, तर 41 नागरिकांनी पाकिस्तानचं नागरिकत्वं स्वीकारलं.
का देश सोडत आहेत नागरिक?
अनेक देशांमध्ये नोकरीसाठी मिळणारा योग्य पगार हे देश सोडण्यामागचं मुख्य कारण ठरत आहे. आपण अमुक एका कामासाठी घेत असलेली मेहनत आणि त्याबदल्यात मिळत असणारा मोबदला यामध्ये भारतात मोठी तफावत असल्यामुळं परदेशात जात आपल्या कामाचं योग्य वेतन मिळवण्याला अनेकांचंच प्राधान्य दिसून येत आहे.
हेसुद्धा वाचा : Meta Job Layoffs 2023: झुकरबर्गनं Sorry म्हटलं अन् नोकरीवरुन काढलं! Meta चे 10000 कर्मचारी एका क्षणात बेरोजगार
देश सोडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, उत्तम सुविधा आणि भविष्यात मिळणाऱ्या संधी. भारतामध्ये सध्या असणारी राजकीय परिस्थिती, धर्माच्या मुद्द्यावरून होणारे बदल आणि एकंदरच प्रशासकीय वातावरण पाहता तुलनेनं परदेशात मिळणाऱ्या सुविधा उत्तमच असल्याचं देश सोडणाऱ्या नागरिकांचं मत. शिवाय परदेशामध्ये शिक्षण, आरोग्य यांसह पर्यावरण आणि इतरही बाबतीत काही सकारात्मक बदल घडत असून हे बदल सध्या भारतीयांना खुणावताना दिसत आहेत.
कोणत्या देशांना भारतीयांची पसंती?
immigration act नुसार भारतीय नागरिकांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळते. या कायद्याअंतर्गत मिळालेल्या तरतूदीनुसार ओमान, कुवेत, बाहरीन, मलेशिया, लिबीया, जॉर्डन, यमन, सूडान, दक्षिण सुदान, सौदी अरब, इंडोनेशिया, कतार, अफगाणिस्तान, सीरिया, लेबनन, थायलंड या देशांमध्ये भारतीय नोकरी करण्याच्या हेतूनं जातात अशी माहिती समोर आली.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 100 देशांमध्ये तब्बल 3.2 भारतीय वास्तव्यास आहेत. मागील 28 वर्षांमध्ये परदेशात जात भारताचं नागरिकत्वं सोडणाऱ्यांची संख्या 346 टक्क्यांनी वाढली आहे.