भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे, मध्य प्रदेशात शांतता नांदावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी अनिश्चित काळासाठी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपलं हे उपोषण मागे घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास जोशी यांनी शिवराजसिंह चौहान यांना नारळ पाणी देऊन, हे उपोषण सोडवलं आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं.


मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्याच्या इतरही भागात उमटू लागल्याने, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कालपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं होतं. यानंतर आज त्यांनी हे आपलं उपोषण मागं घेतलं आहे.


मंदसौरमधील शेतकरी आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आपलं हे उपोषण मागे घेतलं.