`स्वच्छता मित्र` म्हणवणाऱ्या शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थिनीला घाणेरडा गणवेश काढायला लावला आणि...
या व्हिडिओमध्ये आणखी काही विद्यार्थिनीही मुलीजवळ उभ्या असलेल्या दिसत आहेत.
मुंबई : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील बारा टोला येथील सरकारी प्राथमिक शाळा बारा काला येथे शुक्रवारी घडलेल्या घटनेचे चित्र सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये इयत्ता पाचवीची एक विद्यार्थिनी फक्त तिचे अंतर्वस्त्र घालून उभी आहे आणि शिक्षक श्रवण कुमार त्रिपाठी तिचा गणवेश धुताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आणखी काही विद्यार्थिनीही मुलीजवळ उभ्या असलेल्या दिसत आहेत. (Trending News)
आणखी वाचा : 'मी Gay नाही पण मला...', राम गोपाल वर्मा यांनी या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करण्याची व्यक्त केली इच्छा
मिळालेल्या माहितीनुसार, एका 10 वर्षीय आदिवासी मुलीला इतर विद्यार्थिनींसमोर तिचा घाणेरडा गणवेश काढण्यास सांगितल्याप्रकरणी एका शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्यानं रविवारी ही माहिती दिली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा : धक्कादायक! सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये मोठा वाद, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ
मुलीचा गणवेश सुकत नाही तोपर्यंत तिला जवळपास दोन तास शाळेच्या आवारात त्याच अवस्थेत राहावं लागलं, असा दावा काही गावकऱ्यांनी केला. शिक्षकानं सांगितलं की, गणवेश सुकल्यानंतर मुलीला तो परिधान करून वर्गात बसायला पाठवले. (Mp teacher made a girl student to remove dirty uniform from tribal suspended after video went viral)
आणखी वाचा : 'तू खूप मस्त Kiss...', Vidya Balan नं दिली Pooja Bhatt ला शाबासकी
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक त्रिपाठीनं स्वत:ला 'स्वच्छता मित्र' असे सांगून घाणेरडे कपडे परिधान केलेल्या आदिवासी मुलीसोबतचा फोटो काढून त्यांच्या विभागाच्या सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला. शहडोल येथील आदिवासी व्यवहार विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद राय सिन्हा म्हणाले, 'शुक्रवारी रात्री उशिरा हा फोटो शेअर करण्यात आला. या फोटोत बाकी विद्यार्थी हे तिथे उभे आहेत आणि त्यांच्यासमोर मुलीला कपडे काढायला सांगून शिक्षक त्रिपाठी कपडे धूत आहे.
आणखी वाचा : आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा
सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, हा फोटो त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करत त्यांनी सहाय्यक शिक्षक त्रिपाठी यांना शनिवारी निलंबित केले आहे. सिन्हा म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची ब्लॉक शिक्षण अधिकारी (बीईओ) जयसिंगनगर चौकशी करत आहेत.