लखनऊ : मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केलं की, ते सध्या कोणताही नवा पक्ष नाही बनवणार. पत्रकार परिषदेत जेव्हा अखिलेश यादव यांच्याबाबतीत विचारलं गेलं तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं की, तो माझा मुलगा आहे. या नात्याने माझा आशिर्वाद नेहमी त्याच्या सोबत आहे. पण त्याच्या निर्णयांवर मी सोबत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिलेश यांच्या कोणत्या निर्णयांच्या विरोधात तुम्ही आहे असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी योग्य वेळी याचा खुलासा करेल असं देखील म्हटलं आहे.


मुलायम यांनी म्हटलं की, 'अखिलेश यांनी म्हटलं होतं की, तीन महिन्यानंतर अध्यक्षपद पुन्हा वापस करेल. पण त्यांने त्याचा शब्द नाही पाळला. जो आपल्या पित्याचा नाही झाला तो कधीच यशस्वी नाही होणार.'


मुलायम यांनी या दरम्यान हा प्रश्न टाळला की, ते अखिलेश आणि शिवपाल यांच्यापैकी कोणासोबत आहेत. मुलायम यांनी आधी तर हा प्रश्न फेटाळला पण नंतर ते बोलले की ते अखिलेश किंवा शिवपाल यांच्यासोबत नाही तर समाजवादी पक्षासोबत आहेत.