मुंबई : शेअर बाजारात कमाई करण्यासाठी सध्या चांगले पर्याय उपलब्ध आहेत. शेअर बाजारात अचुक शेअरची निवड आणि त्यात योग्य लक्ष्यासह केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा मिळवून देते. शेअर बाजाराने अशाच अचुक ठिकणी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळवून दिला आहे. या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक शेअर म्हणजे बालाजी एमाइंस (Balaji Amines) होय. या शेअरची सध्याची किंमत 3658 इतकी आहे. हा केमिकल कंपनीचा शेअर 2007 साली  NSE वर 28.42 रुपयांवप लिस्ट झाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर खरेदी केले आणि संयम ठेवला. त्यांना आज कोट्यवधींचा परतावा मिळाला असेल.


1 लाखाचे झाले 1.29 कोटी
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज या शेअरने 1.29 कोटींचा परतावा दिला असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे.


कंपनीचे फंडामेंटल्स उत्तम असल्याने अद्यापही गुंतवणूकदारांचा या शेअरवर विश्वास कायम आहे. येत्या काळातही हा शेअर गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देऊ शकतो.