Mutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Mutual Fund SIP Tricks: जर तुम्हाला म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या (SIP) युक्त्या समजल्या असतील तर तुम्हाला करोडपती होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही येथे नमूद केलेल्या विशेष सूत्रानुसार गुंतवणूक केल्यास 30 वर्षांची गुंतवणूक करून तुम्हाला 10 कोटींहून अधिक रक्कम मिळू शकते. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाची (Mutual Fund ) ही तीन सुपरहिट सूत्रे स्वीकारावी लागतील. ही सूत्रे जाणून घ्या. त्यामुळे गुंतवणुकीत कोणतीही रिस्क राहणार नाही.
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की, यासाठी वेळ खूप महत्त्वाची असते. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. म्हणजेच, अशा प्रकारे आपण खूप मोठा निधी गोळा करू शकता.
1. गुंतवणुकीचे पहिले सूत्र
गुंतवणूक सल्लागार बळवंत यांनी सांगितले की, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी काही खास सूत्रे आहेत. पहिले सूत्र 15*15*15 आहे. या सूत्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 15 टक्के रिटर्न दराने 15 वर्षे दरमहा 15,000 रुपये गुंतवले तर त्याच्याकडे सुमारे 1.02 कोटी रुपयांचा निधी असेल. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला लवकर श्रीमंत बनवेल.
2. गुंतवणुकीचे दुसरे सूत्र
गुंतवणुकीचे दुसरे सूत्र 15*15*30 आहे. या सूत्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 15 टक्के परताव्याच्या दराने 30 वर्षे दरमहा 15 हजार रुपये गुंतवले तर त्याला 10.51 कोटी रुपयांचा निधी मिळेल. या दरम्यान, तो 54 लाख रुपयांची गुंतवणूक करेल आणि परतावा वाढून 9.97 कोटी रुपये होईल.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती म्युच्युअल फंडात जास्त काळासाठी जितकी जास्त SIP करेल तितका जास्त फायदा त्याला मिळेल. तथापि, प्रत्येक व्यक्तीने आपल्या सोयीनुसार आणि कालावधी आणि उत्पन्नानुसार अशी गुंतवणूक करुन परतावा मिळवावा.
3. पाच वर्षांच्या विलंबामुळे मोठे नुकसान होऊ शकते
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याचाही मोठा परिणाम होतो. हिशोब करुन समजून घेऊ.
गुंतवणूक सुरु करताना गुंतवणूकदाराचे वय 30 वर्षे आहे असे गृहीत धरा. गुंतवणूकदार 25 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपये गुंतवतो. अशा परिस्थितीत, सरासरी 12 टक्के परताव्याच्या आधारावर, त्याला परिपक्वतेच्या वेळी एकूण 84,31,033 रुपये मिळतात. यावेळी त्या गुंतवणूकदाराचे वय 55 वर्षे असेल.
जर त्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी SIP मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली असती तर संपूर्ण कार्यकाळ 30 वर्षांचा झाला असता. म्हणजेच ही गुंतवणूक 25 वर्षांच्या ऐवजी 30 वर्षांसाठी झाली असती. गेल्या 10 वर्षांच्या रेकॉर्डनुसार, SIP ने सरासरी 15 टक्के परतावा दिला आहे. परंतु जर आपण येथे सरासरी 12 टक्के परताव्याच्या आधारावर देखील पाहिले, तर परिपक्वतेच्या वेळी त्याला एकूण 1,52,60,066 रुपये मिळतील.
परंतु जर या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक केली असती तर त्याला 68 लाख रुपये (68,29,033 रुपये) मिळाले असते जे 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरु केल्यामुळे त्याला मिळाले नाही.
परताव्याच्या आधारावर शीर्ष 10 वर्षांचे म्युच्युअल फंड आणि त्यांचे परतावा
1. एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 20.04 टक्के
2. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 18.14 टक्के
3. इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजना : 16.54 टक्के
4. कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड योजना : 15.9 टक्के म्युच्युअल फंड योजना : 15.9 टक्के
म्युच्युअल फंड योजना: 15.27 टक्के
(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)