आदित्य ठाकरे नरेंद्र मोदींचे तरूण मित्र
सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील संबंध सध्या जरी ताणलेले असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे कौतूक केले आहे. कौतुक करताना नरेंद्र मोदींनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख `माझा तरूण मित्र`, असा केला आहे.
मुंबई : सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील संबंध सध्या जरी ताणलेले असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. कौतूक करताना नरेंद्र मोदींनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख 'माझा तरूण मित्र', असा केला आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी झाडू हाता घेत मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली. सरकारच्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत मुंबईत स्वच्छता करण्यात आली. यावेळी या अभियानात आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनीही भाग घेतला. ठाकरे आणि तेंडुलकर यांच्यासह उपस्थितांनी मंबईतील वांद्रे बॅंडस्टॅंड परिसरात स्वच्छता केली.
दरम्यान, या स्वच्छाता मोहिमेनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर ठाकरेंच्या कामाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. पंतप्रधांनी केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांचा माझा तरूण मित्र असा उल्लेख केला आहे.
मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे, ''माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो'' मोदींच्या ट्विटमुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.