नवी दिल्ली: भारतीय संस्कृतीचा सर्वोत्तम पोशाष म्हणजे साडी मात्र याच पोषाखाला नावं ठेवत रेस्टॉरंटमधून तरुणीला बाहेर काढल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आता वेगळं वळण मिळणार असं दिसत आहे. या घटनेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर याच व्हिडीओनं या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडी नेसून आलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये दिला जात नव्हता असा दावा महिलेनं केला होता. याचं कारण म्हणजे तिने साडी नेसली होती असं सांगण्यात आलं होतं. मात्र या व्हिडीओमध्ये महिलेनं मॅनेजरलाच कानशिलात लगावत असल्याचं दिसत आहे.महिलेने मॅनेजरला कानशिलात लगावल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महिलेच्या वर्तनामुळे तिला रेस्टॉरंटमधून बाहेर काढल्याची चर्चा आहे. 



नेमकं काय आहे प्रकरण नवी दिल्ली इथे एक मोठ्या रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून आलेल्या एका महिलेला प्रवेश नाकारला. या घटनेचा 16 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 'आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल प्रकार नाही, असं रेस्टॉरंटमधील महिला कर्मचाऱ्यांनं या व्हिडिओमध्ये बोलल्याचं ऐकायला मिळतं आहे. त्यामुळे साडी नेसून आलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला होता. लेखिका शेफाली वैद्य यांनी हा व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.



हा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर करत रेस्टॉरंटने देखील या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. या महिलेला काहीवेळ थांबण्याचा सल्ला दिला होता. वेटिंग लिस्ट असल्याने तिला रेस्टॉरंटमध्ये घेता येत नव्हतं. त्यामुळे तिला तिथल्या कर्मचाऱ्यांनी वेटिंग लिस्टमध्ये नाव लिहून थांबण्याचा सल्ला दिला. मात्र महिलेला याचा राग आला. तिने हुज्जत घातली. मॅनेजरपर्यंत हा वाद पोहोचला आणि तिने मॅनेजरच्याच कानशिलात लगावली.



पाहा, धक्कादायक! महिला व्यवस्थित साडी नेसून हॉटेलात गेली, रिसेप्शनिस्टने तिचे असे हाल केले...


साडीशी संबंध नाही तर कानाखाली लगावल्याने तिला हॉटेल बाहेर काढल्याचा दावा रेस्टॉरंटनं केला आहे. या महिनेनं केलेल्या वर्तवणुकीमुळे या महिलेला प्रवेश नाकारल्याचा दावा रेस्टॉरंटकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात रेस्टॉरंटनेही आपली बाजू मांडली आहे. हा व्हिडीओ रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्रावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.