SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Reserve Bank of India KYC Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) KYC बाबत बँकांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. (RBI Notification) आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले की, जर तुम्ही एकदा केवायसी केले असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी पुन्हा शाखेत जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांची सेल्फ डिक्लेरेशन पुरेशी ठरेल, असे केंद्रीय बँकेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच खातेदारांना नव्या नियमानुसार त्यांचा पत्ताही अपडेट करता येणे शक्य आहे. (Bank News in Marathi)
बँकांकडून दोन महिन्यांत होईल पडताळणी
आरबीआयने (RBI) बँकांना बजावले आहे की, ग्राहकाच्या Re-KYC साठी ग्राहकांना बँकेत जाणे आवश्यक नाही. या स्थितीत खातेदाराला ईमेल-आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनलद्वारे केवायसीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. आरबीआयच्यावतीने असे सांगण्यात आले की, जर ग्राहकांच्या पत्त्यात बदल झाला असेल तर ग्राहक आपला अपडेट केलेला पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत देऊ शकतो. यानंतर दोन महिन्यांत बँकेने घोषित केलेल्या पत्त्याची पडताळणी केली जाईल.
काही प्रकरणांमध्ये केवायसी प्रक्रिया पुन्हा करावी लागेल
रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, बँकांना वेळोवेळी त्यांचे रेकॉर्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे, काही प्रकरणांमध्ये, केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु करावी लागेल. हे केवळ ज्या कागदपत्रांची यादी उपलब्ध नसेल त्यांना पुन्हा केवायसी करावी लागेल. किंवा KYC साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची वैधता संपलेली असते. अशा प्रकरणांमध्ये बँकेला ग्राहकाने तयार केलेली केवायसी कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. अशीवेळी ग्राहकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
या आहेत सुरक्षित बँका
Reserve Bank of India: रिझर्व बँकेकडून (Reserve Bank Of India) बॅंकांबाबत एक यादी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयने (RBI) जारी केलेल्या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत (India's Safest Bank) आणि कोणत्या बॅकेत पैसे सुरक्षित नाही, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही बँकेत आर्थिक नुकसान होत असेल तर ग्राहकांसह देशातील सर्व बँकेचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे. आरबीआईने दिलेल्या माहितीनुसार बॅंक ऑफ इंडियासह खासगी बँकेपैकी HDFC Bank आणि ICICI Bank यांचीही नावे यादीत आहेत.
वर्ष 2015 पासून, रिझर्व्ह बँक अशा बँकांची यादी जारी करते ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाच्या आहेत आणि RBI त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. बँकांना आरबीआयकडून रेटिंगही दिले जाते, त्यानंतरच या महत्त्वाच्या बँकांची यादी जाहीर केली जाते. सध्या या यादीत तीन बँकांची नावे आहेत.