Update: नवा महिना, नवे नियम, नवे दर; तुमच्या रोजच्या जीवनावर काय होईल परिणाम ? जाणून घ्या
New Rules and Changes: आता या वर्षाचा शेवटचा महिना काही दिवसांनीच सुरू होणार आहे. तेव्हा दर महिन्याप्रमाणे यंदाही दरांपासून ते नियमांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्येही अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे.
New Rules and Changes: आता या वर्षाचा शेवटचा महिना (last month of the year) काही दिवसांनीच सुरू होणार आहे. तेव्हा दर महिन्याप्रमाणे यंदाही दरांपासून ते नियमांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्येही अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. या बदलांचा तुमच्या रोजच्या जीवावर नक्की परिणाम होणार आहे तेव्हा त्वरित जाणून घ्या या नव्या (new changes) बदलांबद्दल... तेव्हा चला जाणून घेऊया हे बदल कोणते आहेत आणि येत्या 1 डिसेंबरपासून आपल्याला कोणकोणत्या बदलांना समोरे जावे लागणार आहे. खरंतर आपल्याला दैंनदिन जीवनात आपल्या आयुष्यात पेट्रोल - डिझेल, एटीएम (petrol), एलपीजी-सीएनजी, ट्रेन आणि बॅंक (bank) या गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. या गोष्टींमध्ये जराही बदल झाला तर तुमच्या जीवनातही त्याचा परिणाम होतो. (new update these will be the changes from 1 december learn more)
एलपीजी - सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतील बदल
येत्या 1 डिसेंबरपासून एलपीजी (lpg) - सीएनजी (cng) आणि पीएनजीच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. मागच्या महिन्याच्या सुरूवातीला गैस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे अशी आशा आहे की निदान या महिन्यात तरी हे दर क्षमतील. ऑक्टोबर महिन्यात महागाई कमी होण्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे यंदाही ती आशा बाळगायला काहीच हरकत नाही. सध्या अशी चर्चा आहे की कदाचित पेट्रोलियम कंपन्या या किंमतीमध्ये बदल करू शकतात. ही घोषणा 1 डिसेंबरलाच होईल. याशिवाय सीएनजी व पीनएनजीच्या किंमतींमध्येही बदल होऊ शकतात.
एटीएममध्ये काय होतील बदल?
डिसेंबरपासून एटीएममध्ये काही बदल होताना दिसत आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीतही बदल होऊ शकतात. अनेकदा आपल्या एटीएममधून (ATM) पैसे काढतानाही फार सावधगिरी बाळगायला सांगतात. समोर आलेल्या माहितीनूसार, डिसेंबर महिन्यापासून पंजाब नॅशनल बॅंक आपल्या एटीएममधून कॅश काढण्याच्या पद्धतीनं बदल करू शकतात. अशी माहिती समोर आली आहे की एटीएममधून आधी कार्डनं पैसे काढावे लागत असताना आता ओटीपी जनरेट होऊन पैसे काढले जातील. हा ओटीपी एटीएमच्या स्क्रीनवर कॉलम येईल तिथे टाकावा लागेल.
हेही वाचा - सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचा मोठेपणा; सुनावणी दरम्यान मराठीतून साधला संवाद
लोकल ट्रेनच्या वेळा बदलणार?
डिसेंबरपासून आता हिवाळ्याचा माहोल सुरू होणार आहे. ते या हिवाळ्यात प्रवासही अधिक सुखसोयीस्कर होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिवाळ्यात धुके वाढू लागते. त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेला घ्यावा लागला आहे. धुके पाहता रेल्वेनेही (local trains) वेळापत्रकात बदल केला आहे. तेव्हा अशा परिस्थितीत तुमच्या लोकलच्या ट्रेनच्या वेळा बदलल्या जातील. आणि तुम्हाला 1 डिसेंबरपासून नवी वेळापत्रक येणार आहेत.
पेन्शनधारकांसाठीही बदल
पेन्शनधारकांसाठी (pension) जीवन प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. त्यांनी या महिन्याच्या अखेरीस त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर 1 डिसेंबरपासून ते करताना त्यांची गैरसोय होऊ शकते. जर जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर त्यांचे पेन्शन देखील थांबू शकते.
हेही वाचा - वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत
13 दिवस बँका काम करणार नाहीत
डिसेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे. या महिन्यात ख्रिसमस, वर्षाचा शेवटचा दिवस (Bank Holiday) आणि गुरु गोविंद सिंग जी यांची जयंती देखील आहे. या निमित्ताने बँकांना सुटीही असणार आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक सणांच्या आधारे सुटीही असते. सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील. या काळात ग्राहकांना त्यांचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे करता येणार आहे.