राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांकडे दोन पर्याय
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
२४३ सदस्यांच्या विधानसभेत मॅजिक फिगर म्हणून १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या लालूंच्या राजदचे ८०, काँग्रेस २७, जेडीयूचे ७१ आणि भाजपचे ५३ आमदार आहेत. तसेच इतर चार आमदार आहे.
नितीश कुमारांचे सत्ता समिकरण...
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे दोन पर्याय आहे. एक तर भाजपसोबत सत्ता स्थापन करणे किंवा मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे.
भाजपसोबत गेल्यास
जेडीयू ७१, भाजप ५३ आणि ४ अपक्ष = १२८
लालूंचा पर्याय
राजद ८० + भाजप ५३ + अपक्ष ४ = १३९