नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी गोरखपूर येथील महाराणा प्रताप शिक्षा परिषदेच्या कार्यक्रमात सत्यपाल सिंह यांनी भाषण करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


जर एखाद्या मुलीने जर जीन्स घालून जर लग्न मंडपात आली तर किती मुलं तिच्यासोबत लग्न करण्यास तयार होतील? असा प्रश्न सत्यपाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.  


एखाद्या व्यक्तीने जर जीन्स घालून मंदिराचा महंत बनण्याची भाषा केली तर, लोक त्याला स्वीकारतील का? अगदी त्याच प्रमाणे जीन्स घातलेल्या मुलींशी कोणत्याही मुलाला लग्न करावेसे वाटणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी केलं आहे.


कोण आहेत सत्यपाल सिंह?


सत्यपाल सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांनी पोलीस खातं सोडून उत्तर प्रदेशातील बागपत येथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जागाही मिळाली.


नव्या वादाला फोडले तोंड


सत्यपाल सिंह हे एक केंद्रिय मंत्री असून त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्याने आता नवा वाद उभा राहण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.



२०१६मध्ये सत्यपाल सिंह यांनी म्हटलं होतं की, "जर तुम्हाला एखादा गुंड त्रास देत असेल तर मला सांगा, मी मुंबईचा सर्वात मोठा गुंड राहीलेलो आहे. भाईंचा भाई आहे, दिसण्यास सरळसाधा आहे. गुंडांसाठी गुंड आहे आणि सज्जनांसाठी सज्जन आहे" असंही सत्यपाल सिंह यांनी म्हटलं होतं.