नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एकूण 57 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रीमंडळात सर्व वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात एका अशा व्यक्तीचा समावेश केला आहे. ज्यांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील ते नाव आहे एस जयशंकर यांचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस जयशंकर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. डोकलाम वादात संयुक्त राष्ट्रात भारताची बाजू भक्कमपणे मांडण्याचं काम एस. जयशंकर यांनी केलं होतं. एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख पंतप्रधान होण्याआधीपासून आहे. 2012 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते चीनच्या दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांची भेट जयशंकर यांच्यासोबत झाली. त्यांच्यात अशी चर्चा झाली की, जयशंकर मोदींचे विश्वासू बनले.


जानेवारी 2015 ते 2018 पर्यंत परराष्ट्र सचिव असताना मोदींच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. ज्यामुळे अमेरिकासह अरब देशांमध्ये देखील भारताचे संबंध सुधारले आणि विकासाचा मार्ग खुला झाला. परराष्ट्र सचिव बनण्याआधी एस जयशंकर हे अमेरिकेतील भारताचे राजदूत होते. त्यांनी अमेरिका सरकार आणि मोदी सरकारला जवळ आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. महत्त्वाचं म्हणजे मोदींच्या मंत्रीमंडळात एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद मिळालं आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी माघार निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांच्या जागी. एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री झाले आहेत.


जयशंकर यांनी सप्टेंबर 2014 मध्ये मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्याची पूर्ण योजना आखली. मोदींचा हा अमेरिका दौरा त्यांनी यशस्वी करुन दाखवला. मोदींनी अमेरिकेच्या मेडिसन स्क्वायरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. जयशंकर यांना जानेवारीमध्ये देशातील चौथा सर्वात मानाचा पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सहयोग वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली.


एस. जयशंकर यांना चीन, अमेरिका आणि रशियामध्ये काम केल्याचा अनुभव आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात दुसरं असंच नाव आहे हरदीप पुरी यांचं. हरदीप पुरी हे अमृतसर येथून पराभूत झाले असले तर त्यांना मंत्रीमंडळात घेण्यात आलं आहे. हरदीप पुरी यांच्यावर मोदींचा पूर्ण विश्वास आहे. योजना कशी बनवावी. ती योजना अंमलात कशी आणावी आणि त्याचा फायदा कसा करुन घ्यावा हे हरदीप पुरी यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं.