नवी दिल्ली : ५ दिवस बँका बंद राहतील असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. पण आता ५ नाही तर ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २९ ला महावीर जयंती, ३० ला गुड फ्रायडे तर ३१ ला शनिवारी बँका सुरु असणार आहेत. १ एप्रिलला रविवार असल्याने बँका बंद राहतील. २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोजिंग असल्याने बँका बंद असणार आहेत.


बँकांमध्ये कामकाज होणार


बँकांना २ रा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पण ३१ मार्चला पाचवा शनिवार येत असल्याने बँका सुरु राहतील. सामान्य कामकाज देखील या दिवशी सुरु राहणार आहे.  ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे मुख्य सचिव डी. थॉमस फ्रैंको राजेंद्र देव यांनी न्यूज एजेंसी आटएएनएसला माहिती दिली आहे की, 'बँकांमध्ये ३१ मार्चला कामकाज सुरु राहिल.