Indian Railway Project : आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवरही पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) बनवता येणार आहे. एवढेच नाही तर रेल्वे प्रवाशांना फोन रिचार्ज करण्याची, वीज बिल भरण्याची सुविधाही मिळणार आहे. ईशान्य रेल्वेच्या दोन स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. ही सुविधा लवकरच गोरखपूरसह अन्य प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RailTel देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर उभारत आहे. पहिल्या टप्प्यात, ईशान्य रेल्वेच्या दोन स्थानकांवर, वाराणसी शहर आणि प्रयागराज रामबाग इथं  हे सेंटर उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात गोरखपूरसह इतर अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थानकं निश्चित केली जात आहेत. प्रवाशांना रेलवायरच्या कियोस्कच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे स्थानकावरच्या या सेंटरवर इन्कम टॅक्स रिटर्नची सुविधाही मिळणार आहे.


इतर सेवांमध्ये प्रवास तिकिटे (ट्रेन, विमान, बस इ.), आधार कार्ड, मतदार कार्ड, मोबाईल फोन रिचार्ज, वीज बिल भरणा, पॅन कार्ड, प्राप्तिकर, बँकिंग, विमा आणि बऱ्याच सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.


ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, RailTel ने पायलट प्रोजेक्ट म्हणून दोन स्टेशनवर Rail Wire Sathi Kiosks बसवले आहेत. येत्या काळात अन्य स्थानकांवरही ते बसविण्याचं नियोजन आहे. याद्वारे रेल्वे ग्राहकांना रेल्वे स्थानकांवर वीजबिल भरणे, मोबाईल रिचार्ज, आधार आणि पॅन कार्डसाठी फॉर्म भरणे आदी सुविधा मिळणार आहेत.