मुंबई : आतापर्यंत तुम्ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाईल फोन इएमआयवर खरेदी केले असतील पण तुम्ही आता कपडे देखील इएमआयवर खरेदी करु शकणार आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-कॉमर्स वेबसाईट मिंत्रा (Myntra) ने याची सुरुवात केली आहे. मिंत्रा फक्त ५१ रुपयांच्या मासिक हप्त्यावर कपडे विकत आहे. असं करणारी ही पहिली ई-कॉमर्स वेबसाईट आहे.


याआधी ईएमआय फक्त महागड्या वस्तूंवर ईएमआय सेवा देत होती. पण आता मिंत्रा 1,300 किंवा त्यापेक्षा अधिकच्या खरेदीवर मासिक हप्त्यांवर कपडे विकत देणार आहे. हा पर्याय फक्त मिंत्राद्वारे खरेदी केलेल्या जबोंग वेबसाईटवर दिला जाणार आहे.


मिंत्राने ईएमआयच्या माध्यमातून एचडीएफसी बँक, सिटी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एमेक्‍स आणि एचएसबीसी सारख्या बँकांसोबत करार केला आहे. या बँकांच्या क्रेडिट कार्डमधून खरेदी केल्यानंतर तीन ते २४ महिन्यांचा ईएमआय पर्याय देण्यात आला आहे. बँक यासाठी १३ ते १५ टक्के व्याज घेणार आहे.