Gautam Adani Group: गौतम अदानी फसवणूक आणि लाचखोरीप्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टानं अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असतानाच आता देशातील सर्वाधिक धनवान उद्योगसमूह अशी ओळख असणाऱ्या Adani Group मध्ये आणखी एक भूकंप आला आहे. गुरुवारी अदानींविषयी आलेल्या फसवणुकीच्या बातमीमुळं शेअर बाजारातही समुहाच्या शेअरची मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. इथं शेअर नीचांकी स्तर गाठतानाच कंपनीपुढं आणखीही कैक आव्हानं उभी राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वतीनं या गटात येणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता अमेरिकेतून झालेल्या दोषारोपण प्रकरणी म्हणजेच ₹2.45 लाख कोटी कुठे उधळले यासंदर्भात अदानींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. गुरुवारी कॉर्पोरेट अनाऊंसमेंटच्या माध्यमातून Ambuja Cement, Adani Total Gas Limited, Adani Power, ACC Ltd., Adani Wilmar, NDTV, Adani Energy Solutions, Adani Enterprises, Adani Green Energy, Adani Ports and Special Economic Zone ला पुन:पडताळणीसंदर्भातील नोटीस जारी केली आहे. 


सदर प्रकरण समोर येताच अदानी समुहाचा मार्केट कॅप जवळपास 2.45 लाख कोटी रुपयांनी कोसळला. थोडक्यात सुरुवातीच्या दोन दिवसांच्या आतच अडीच लाख कोटी रुपये बुडाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील मुख्य कंपनी असणाऱ्या  Adani Energt Solutions मध्ये 20 टक्के, Adani Green Energy मध्ये 19.53 टक्के आणि Adani Total Gas मध्ये 18.14 टक्के इतकी घट झाली आहे. 


हेसुद्धा वाचा : Gautam Adani Charged: फसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, Adani Bonds कोलमडले 


अदानी समुह नेमका कसा संकटात आला? 


फेडरल कोर्टानं गौतम अदानी यांच्यासह 7 जणांना दोषी ठरवलं. साधारण 2020 ते 2024 दरम्यान, अदानी यांच्यासमवेत सर्व आरोपींनी भारत सरकारशी करारबद्ध होण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना एकदोन नव्हे, तर तब्बल 250 मिलियन डॉलरची लाच देण्याचीही तयारी दाखवली. ही एक अशी योजना होती जिथं 20 वर्षांमध्ये 2 बिलियन डॉलरहून अधिकचा नफा मिळण्याची शक्यता होती. या प्रकरणी पुढील कारवाई का असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.