नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान काही जाणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याशिवाय अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अशा सर्वांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. नवोदय विद्यालयात नोकरीची मोठी संधी आहे. जवळपास 1 हजार 925 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी बातमी आहे. नवोदय विद्यालय समितीने बंपर भरती काढली आहे. एकूण 1925 रिक्त जागांवर तीन गटांमध्ये भरती करण्यात येणार आहे. अ , ब आणि क गटातील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. 


इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत 12 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी असणार आहे. 


कोणत्या पदांसाठी किती जागा?
सहाय्यक आयुक्त – 5
सहाय्यक आयुक्त (प्रशासन) - 5 
महिला स्टाफ नर्स - 82 
असिस्टंट सेक्शन ऑफिसर - 10 
ऑडिट असिस्टंट - 11 
कनिष्ठ अनुवाद अधिकारी - 04 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 1 
स्टेनोग्राफर - 22 
संगणक ऑपरेटर -  4 
केटरिंग असिस्टंट - 87 
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (RO Cadre) - 8 
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JNV संवर्ग) - 622 पदे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर - 273 
लॅब अटेंडंट -142 
मेस हेल्पर -629  
MTS -23 


मिळालेल्या माहितीनुसार 1200 हून अधिक नॉन-टीचिंग पदांच्या भरतीसाठी आणि निवड प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील  9 ते 11 मार्च 2022 लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट करण्यात येईल. अंतिम टप्प्यात मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीनंतर निवड करण्यात येईल. 


सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला नर्सिंग स्टाफसाठी 1200 रुपये, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि एमटीएससाठी 750 रुपये आणि इतर पदांसाठी उमेदवाराला 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळू शकणार आहे.