Corona : जगात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. चीननंतर युरोपमध्ये ही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  Omicron चा सब-वेरिएंट BA.2 मुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंतचा हा सर्वात घातक वेरिएंट असल्याचं देखील त्यांचं मत आहे. (Fourth Wave of Corona)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशनच्या माहितीनुसार, Omicron चे 5 सब-वेरिएंट आहेत. BA.1, BA.1.1, BA.2, BA.2.2 आणि BA.3. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जगभरात अनेक ठिकाणी BA.2 चे प्रकरणं समोर आली आहेत. BA.2 चा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता.


BA.2 किती घातक?


WHO ने म्हटलंय की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम फक्त चीन आणि यूरोप पुरतंच मर्यादित राहणार नाही. जगात रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे मेडिकेयर टीमचे हेड राहिलेले एंडी स्लेविट यांनी ट्विट करत म्हटलंय की, ज्या प्रकारे यूरोपात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. तसेच काही दिवसात अमेरिकेत देखील वाढू शकतात.


WHO चे माजी सदस्य एंड्रियन एस्टरमेन यांनी ट्वीट केलंय की, BA.1 च्या तुलनेत BA.2 हा 1.4 पट अधिक संसर्ग वाढवतो आहे. BA.2 हा वेरिएंट कमीत कमी 12 लोकांचा संक्रमित करु शकतो.


भारतात येणार चौथी लाट?


IMA कोच्चीचे रिसर्च सेलचे हेड डॉ. राजीव जयदेव यांच्या मते भारतात चीनपेक्षा जबरदस्त हायब्रिड इम्युनिटी आहे. मागच्या वर्षी दुसरी लाट आली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला. ज्यामुळे लोकांची इम्युनिटी वाढली. त्यामुळे भारतात कोरोनाचा संसर्ग कमी आहे.


कोविड टास्क फोर्स NTAGI चे प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोडा यांनी म्हटलं की, भारतात BA.2 चे रुग्ण वाढण्याची शक्य़ता कमी आहे. पण जर नवा वेरिएंट आला तर रुग्णांची संख्या वाढू शकते. 22 जूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.