ओमिक्रॉनची पहिली लक्षणं ताप किंवा खोकला नाही? तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं थेट डॉक्टराकडून
जास्त वजन असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन चिंतेची बाब, आणखी काय म्हणाल्या डॉक्टर पाहा
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने कहर केला आहे. नव्या व्हेरिएंटसोबत आता ओमिक्रॉनमुळे दहशत पसरली आहे. ओमिक्रॉनबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? कोणाला ओमिक्रॉनचा धोका सर्वात जास्त आहे? घरातील एका सदस्याला हा आजार झाला तर लगेच दुसऱ्याला होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी दिली आहेत.
डॉ एंजेलिक कोएत्जी यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. बाजारपेठा बंद करून काही होणार नाही. ओमिक्रॉनचे सौम्य लक्षण असणाऱ्यांनाही उपचाराची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा हा व्हेरिएंट सापडला तेव्हात WHO ने याबाबत चिंता व्यक्त केली होती.
भारतातही ख्रिसमस आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचं संसर्ग वाढू नये यासाठी कठोर नियम लावण्यासंदर्भात नियमावली तयार केली जात आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. हे प्रश्न असे आहेत जे लोकांच्या मनात गेल्या अनके दिवसांपासून आहेत.
कुटुंबात एकाला कोरोना झाला तर इतर सदस्यांना किती धोका?
उदा म्हणून पाहिलं तर 7 जणांचं कुटुंब असेल त्यापैकी एकाला ओमिक्रॉन झाला तर इतर सदस्यांनाही ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. कुटुंबात ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे.
सौम्य लक्षण असणाऱ्यांनी रुग्णालयात अॅडमिट व्हावं का?
सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनाही उपचाराची आवश्यकता आहे. डॉ एंजेलिक कोएत्जी यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय या रुग्णांनी तातडीनं उपचार घ्यायला हवेत.
ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कुणाला?
तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्ही दोन्ही लसीचे डोस घेतले नसतील तर धोका जास्त आहे. शिवाय ज्यांचं वजन जास्त आहे स्थूल लोकांना ज्यांनी लसही घेतली नाही अशांना धोका खूप जास्त आहे.
ओमिक्रॉनची लक्षणं काय आहे?
स्नायुंमध्ये दुखापत हे देखील ओमिक्रॉचं लक्षण आहे. स्नायूमध्ये वाढत जाणारं दुखणं हे पहिलं लक्षण आहे. ताप किंवा खोकला नाही. पाठीच्या खाली कंबरे दुखणं हे देखील एक लक्षण आहे. डोकं दुखी अंगदुखी आणि थकवा ही देखील प्रमुख लक्षणं आहेत.
बाहेर जाणं किती कठीण आहे?
ओमिक्रॉनमुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. लस हे त्यापासून संरक्षण देणारं कवच आहे. या नव्या व्हेरिएंटपासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं आवश्यक आहे. जर अचानक या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढले तर कठोर नियमांची अंमलबजावणी पुन्हा करावी लागू शकते.
कोरोना आणि न्युमोनिया यामध्ये काही संबंध आहे का?
ओमिक्रॉन तुम्हा फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वसनावर परिणाम होतो. अर्थात त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. मात्र सध्या तरी याची सौम्य लक्षणं पाहायला मिळाले आहेत.
बुस्टर डोस घ्यावा का?
कोरोनाच्या बुस्टर डोस घ्यावा असंही सांगितलं आहे. भारताला तर बुस्टर डोस द्यावा असंही डॉ एंजेलिक कोएत्जी यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन केल्याने कोरोनाचा धोका कमी होतो?
लॉकडाऊन केल्यानं संसर्ग अटोक्यात येईल असं म्हणणं थोडं कठीण आहे. याचं कारण व्हायरस सगळीकडे आहे. त्यामुळे काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे. सण-उत्सवात सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
कठोर पावलं उचलण्याची खरी गरज केव्हा?
जेव्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात होईल तेव्हा कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.
नव्या वर्षात करणं योग्य ठरेल का?
दक्षिण आफ्रिकेत सेरोपोसिटिविटीचा दर सर्वाधिक आहे. भारतात कोणत्याही क्षणी ओमिक्रॉनची लाट येऊ शकते अशी चिंताही व्यक्त केली आहे.