बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...
बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
Extra Marital Affair : लग्न जर दोन जीवांचं नातं असले तरी त्या दोघांसोबत दोन कुटुंबाचे ते मिलन असतं. प्रेम, विश्वास आणि आपुलकीने दुसऱ्या घरातील मुलगी ही सासरी येते आणि सर्वांना आपलंस करते. पण एका सुनेच्या धक्कादायक कृत्याने नवऱ्याचा विश्वास घात झाला एवढंच नाही तर सासूचा जीव गेला. सूनेने केलेल्या कृत्यावर अजून कुटुंबियांचा विश्वास बसत नाहीय. झालं असं की नवरा घराबाहेर गेल्यावर सून बेडरूममध्ये जाऊन दार बंद करुन घ्यायची. एक दिवस सासू अचानक तिच्या खोलीत गेली अन् तिला जे सत्य समजलं त्यानंतर त्या कुटुंबात वादळ आलं.
नवऱ्याच पाऊल घराबाहेर पडताच बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवायची. विशेष म्हणजे तिचा बॉयफ्रेंड हा तिचा शेजारी होता. नवरा ऑफिससाठी बाहेर पडल्यावर ती प्रियकराला बेडरुममध्ये घेऊन जायची आणि दार लावून घ्यायची. एक दिवस अचानक सासू तिथे आली आणि तिने बेडरुमचं दार उघडलं ते सूनेचं कृत्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
सासूने आपल्याला या प्रियकरासोबत रोमान्स करताना पाहिलं यामुळे सूनही घाबरली. आता आपलं गुप्त नवऱ्यासमोर उघडणार. सासू आपल्या लेकाना सूनेचं कृत्य सांगेल या भीतीने तिने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली. त्यानंतर कोणाला समजू नये, म्हणून मृतदेह जंगलात फेकून दिला. काही लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी आपल्या पद्धतीने गुन्हेगारांना शोधून काढायला सुरुवात केली. चौकशीसाठी सूनेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या उत्तरामुळे त्यांना संशय आला. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस पोलिसांनी तिला बोलत केलं आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली.
हेसुद्धा वाचा - मध्यरात्री मोठ्या सूनेचा बॉयफ्रेंड घरी आला अन् अंधारात भलत्याच बेडवर असलेल्या धाटक्या सूनेच्या...; पुढे जे झालं...
बॉयफ्रेंड तिच्या शेजारीच राहायचा त्यामुळे नवरा गेल्यावर तो घरी यायचा आणि त्यानंतर दोघांचा रोमान्स सुरु होता. तितक्यात सासू आली आणि तिने बेडरुमचा दरवाजा उघडताच तिला सूनचं अश्लील चाळे करताना दिसून आली. सासू नवऱ्याला सांगेल म्हणून आम्ही तिची हत्या केली असं तिने पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला कोर्टात हजर केलं असता त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. 24 वर्षाच्या लक्ष्मी सिंहने प्रियकर सचिनच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली. आरोपी लक्ष्मीने सांगितलं की, 'मागच्या अनेक वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या सचिन सोबत तिचं अफेयर सुरु होतं. दोघे अनेकदा भेटायचे. सोमवारी पती कामासाठी बाहेर निघून गेला, त्यावेळी तिने प्रियकराला बोलावलं. माझ्या सासूने आम्हाला दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. तिने नवऱ्याला हे सांगू नये म्हणून मी सासूची हत्या केली. डोक्यावर विटेचे अनेक प्रहार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही भयानक घटना मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील आहे.
मुलगा अंकुर सिंह याला पत्नी लक्ष्मीच्या कृत्यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याच्या आईची हत्या केली. या घटनेचा अंकुरला मोठा धक्का बसला आहे. मी फक्त काही वेळासाठी बाहेर गेलो होतो. पत्नीवर आईची जबाबदारी होती. पण तिने माझ्या आईला मारुन टाकलं असं अकुंशने आपल्या वेदना मांडल्यात.