नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने पाकिस्तानच्या गोळीबाराचा मुद्दा उचलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद ४ जवानांबाबत विरोधी पक्षाने वेलमध्ये जाऊन सरकारविरोधात प्रदर्शनं केली. याआधी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवर धन्यवाद प्रस्तावाला सुरुवात झाली होती. भाजप अध्यक्ष अमित शाहांनी याची सुरुवात केली. शाहांनी त्यांच्या भाषणात केंद्र सरकारच्या कामाचं उल्लेख करत काँग्रेसवर हल्ला केला.


मंगळवारी लोकसभेत बजेटवर चर्चा सुरु होणार आहे. दोन वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला सुरुवात होईल. भाजप खासदार हुकुम सिंह यांच्या निधनामुळे सोमवारी लोकसभेचं कामकाज बंद होतं.


विरोधी पक्षाने लोकसभेत उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये झालेल्या घटनेचा मुद्दा उचलला होता. २६ जानेवारीला कासगंजमध्ये हिंसा झाली होती. ज्यामध्ये चंदन गुप्ता नावाच्या युवकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. कासगंजमध्ये यानंतर परिस्थिती बिघडली. राज्यसभेत समाजवादी पक्षाने हा मुद्दा उचलला होता.