141 Opposition MPs Suspended From Parliament: संसदेची सुरक्षा भेदून थेट लोकसभेच्या सभागृहामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावी अशी मागणी करुन गोंधळ घालतल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या खासदारांवर पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतून आज 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. सोमवारीच लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारां निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने एकूण निलंबित खासदार 92 झाले होते. त्यात आज अधिक भर पडली असून एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार निलंबित झाल्याने आता किती खासदार संसदेत उरलेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


सर्वात मोठा पक्ष भाजपाच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या म्हणजेच 16 व्या लोकसभेत एकूण जागा 545 इतक्या आहेत. यापैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे एकूण 324 खासदार आहेत. सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत. भाजपाचे एकूण 290 खासदार आहेत. एनडीए 2019 च्या निवडणुकीमध्ये 353 जागा निवडून आल्या होत्या. मात्र नितीश कुमार आणि अन्य साथीदार सोडून गेल्यानंतर एनडीएच्या खासदारांची संख्या आजच्या घडीला 324 इतकी आहे. यापैकी सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत. भाजपाचे 290 खासदार असून शिवसेना (शिंदे गटाचे) एकूण 13 खासदार आहेत. अजित पवार गट, जनता दल (सेक्युलर), नॅशनल पिपल्स पार्टीचा प्रत्येकी एक खासदार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही जनशक्ती पार्टीचे 5 खासदार आहेत. 


विरोधी पक्षाचे खासदार निलंबित


संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दिवसभराच्या गदारोळानंतर झालेल्या अभूतपूर्व कारवाईमध्ये सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा विरोधी पक्षातील एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. या कारावाईमुळे कारवाई करण्यात आलेल्या 'इंडिया' आघाडीतील खासदारांची संख्या 92 वर पोहोचली आहे. सभागृहातील कामकाजामध्ये विरोधी खासदारांनी प्रक्रिया नियमांचा भंग केला आहे. तसेच त्यांचे वर्तन अथ्यंत आक्षेपार्ह व असल्य अशल्याची कारणे देत लोकसभेमध्ये संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तर राज्यसभेमध्ये सभागृह नेते पीयुष गोयल यांनी विरोधी खासदारांच्या निलंबानाचे प्रस्ताव मांडले. हे प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यामध्ये आज म्हणजेच मंगळवारी (19 डिसेंबर रोजी) आणखीन 49 खासादारांची भर पडली आहे. एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेबद्दल बोलायचं झाल्यास एनडीएचे एकूण 108 खासदार आहेत. राज्यसभेची एकूण क्षमता 250 इतकी आहे. राज्यसभेमधूनही विरोधी पक्षातील 45 खासदार निलंबित करण्यात आलेत.


एकूण आकडेमोड काय सांगते?


एनडीएचे खासदार वगळल्यास लोकसभेमध्ये 221 खासदार शिल्लक राहतात. त्यापैकी 95 खासदार निलंबित झाले आहेत. म्हणजेच आता लोकसभेमध्ये 126 अन्य पक्षांचे खासदार शिल्लक आहेत असं प्राथमिक आकडेवारी सांगते. राज्यसभेमध्येही 250 मधील 45 खासदार निलंबित करण्यात आले तर 205 खासदार शिल्लक राहतात. त्यापैकी 108 खासदार एनडीएचे आहेत. म्हणजेच आता राज्यसभेत विरोधीपक्षाचे केवळ 97 खासदार आहेत. संबंधित आकडेवारी रिक्त जागांचा विचार न करता मांडण्यात आली आहे.