जादुई हिरव्या प्रकाशानं व्यापलं लडाखचं आभाळ; सोशल मीडियावर Video Viral
Northern Lights in Ladakh : लडाखच्या आकाशात दिसणारं चांदणं पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. आपण जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावरूनच तिला न्याहाळतोय आणि चांदण्यात न्हाऊन निघतोय असंच वाटतं. पण, हे काहीतरी वेगळंच होतं...
Northern Lights in Ladakh : लडाख.... एक असा प्रदेश जिथं अवाढव्य डोंगर आणि विस्तीर्ण भूभाग, सोबतच निळ्याशार पाण्याचे तला तुम्हाला आश्चर्यचकित करुन जातात. जगाच्या पाठीवर आपण एका अशा देशाचे नागरिक आहोत जिथं विविध भौगोलिक परिस्थितीनुसार विविध भौगोलिक रचना असणारा प्रदेश अगदी सहजपणे तुम्हाला पाहता आणि अनुभवता येतो. लडाख त्यापैकीच एक. क्षणात बदलणारं हवामान इथं अनेकदा अडचणी निर्माण करतं. पण, यावेळी मात्र लडाखच्या वातावरणानं तिथं आलेल्या पर्यटकांसोबतच हवामान अभ्यासक आणि तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का दिला.
लडाखच्या आकाशात हिरव्या रंगाचे प्रकाशझोत?
नुकतेच लडाखच्या आकाशात हिरव्या-मोरपंखी रंगाचा जादुई प्रकाश पाहायला मिळाला. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आलेल्या वादळामुळं लडाखच्या आकाशामध्ये ही अनोखी चमक पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली. इथं आलेल्या पर्यटकांसाठी मात्र हा एकमेवाद्वितीय अनुभव ठरला. सरस्वती पर्वत आणि नजीकच्या परिसरात Indian Astronomical Observatory (IAO) कडून या दुर्मिळ घटनेची दृश्य टीपण्यात आली. अनेक ठिकाणी या प्रकाशाला आणि तत्सम परिस्थितीला Auroras म्हणून संबोधलं जातं.
Auroras सहसा समुद्र सपाटीपासून अतिशय जास्त उंचीवर असणाऱ्या भागांमध्ये पाहातया मिळतात. जगात हे आश्चर्य नॉर्वे, अलास्का आणि आणखी काही देशांमध्ये पाहता येतं. भारतात मात्र अशी परिस्थिती उदभवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं तज्ज्ञांचं मत.
हेसुद्धा वाचा : 'या' Airlines ची पुढील दोन दिवसांमधील सर्व उड्डाणं रद्द; तुमचंही बुकींग असेल तर आताच पाहा ही बातमी
लडाखमधील हानले भागातील IAO च्या वर लावण्यात आलेल्या एका 360 डिग्री कॅमेरातून ही दृश्य टीपण्यात आली आणि संपूर्ण जगालाच आश्चर्याचा धक्का बसला. जाणून भुवया उंचावतील पण ही परिस्थिती म्हणजे सूर्यातून निघणारे plasma particles आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र यांच्यात चालणारा संवादच आहे.
IAO च्या माहितीनुसार सरासरी कमी उंचीवर असणाऱ्या ठिकाणी auroras दिसल्यामुळं चीन, युरोप आणि लडाखमध्ये आकाशाची विविधं रुपं पाहायला मिळू शकतात. अशा प्रकारचं एक वादळ 2015 मध्ये आल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.