TRENDING Viral Video: सोशल मीडियावर अनेक विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे इतके भयानक असतात की त्यामुळं मन विचलीत होतं. गेल्या काही वर्षांत तरुणांमधील हृदय विकाराच्या धक्क्यामुळं प्राण गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे. यात दुचाकी चालवत असलेल्या एका तरुणाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळं तुम्हीदेखील विचलीत व्हाल. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली कोसळला. त्याचवेळी गंभीररित्या जखमी झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. मैसूर येथील हा व्हिडिओ असून बोगाडी रिंग रोड येथे हा अपघात घडला आहे. मृत व्यक्तीचे वय 40 वर्ष असून हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 


रवी असं या तरुणाचे नाव असून तो नंजदेवनपुरा गावातील रहिवाशी आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रवी हा दुचाकी चालवत होता. त्याचवेळी अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी त्याची दुचाकीवरील पकड विस्कळीत झाली आणि त्याचा तोल गेला. दुचाकी अनियंत्रित झाल्याने तो एका भिंतीवर जाऊन आदळला आणि खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे. 



व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तर व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सोशल मीडिया युजर्सना हे पाहून धक्काच बसला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर अशा परिस्थितीत लगेचच स्थानिकांनी आपत्कालीन नंबरवर फोन करुन वैद्यकीय मदत केली पाहिजे. वैद्यकीय सेवा मिळायला वेळ लागत असेल तर त्या व्यक्तीला एस्पिरीन द्यायला हवे. जेणेकरुन रक्ताच्या गुठळ्या कमी होतील आणि धोका कमी होईल.