Petrol and Diesel Price Today 8th April 2023: सीएनजी-पीएनजी झालं स्वस्त, मग पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय? जाणून घ्या
Petrol Diesel Price on 8th April 2023: जगभरात कच्चा तेलाच्या (Crude Oil) किमती या वाढू लागल्या आहेत त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही (Petrol and Diesel Price) वाढ होते आहे का याकडे ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol and Diesel Price Today) फारसे बदल झालेले नाहीत असे पाहायाला मिळते आहे.
Petrol Diesel Price on 8th April 2023: कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Petrol Price) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्याही किंमतींमध्ये होणारा का? याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये फारसा बदल झालेला पाहायला मिळत नसून अनेक (Mumbai Petrol Price) शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज मुंबईत पेट्रोलचा भाव हा 106.31 रूपये प्रति लीटर इतका आहे. 1 एप्रिलपासून हा भाव स्थिर दिसतो आहे. तर डिझेलचा भाव हा 94.27 रूपये प्रति लीटर इतका आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही बाब दिलासाजनक आहे. (Petrol and diesel price today 8th april 2023 know the petrol and diesel price today in your cities)
पुणे, नाशिक, नागपूरसारख्या (Petrol and Diesel Price in Delhi) परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या समाधानकारक नाहीत त्या शंभर रूपयांच्या वरच आहेत. परंतु अद्याप तर तुम्हाला जास्तीत पैसे मोजावे लागणार नाहीत असे दिसते. पुण्यात पेट्रोल 105.84 रूपये प्रति लीटर आणि डिझेल हे 92.59 रूपये प्रति लीटर इतके आहे. नाशिक येथे पेट्रोलचे दर हे 106.77 रूपये प्रति लीटर इतके आहे तर डिझेल 95.81 रूपये प्रति लीटर इतके आहे. नागपूर येथे पेट्रोल 106.04 रूपये प्रति लीटर तर डिझेल हे 92.59 रूपये प्रति लीटर इतके आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती आहेत?
मुंबईसह इतर महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमती या फारश्या बदलल्या नाहीत. चेन्नई, कोलकाता आणि मुंबईच्या मानानं दिल्लीत (Petrol and Diesel Price in Delhi) पेट्रोलच्या किमती कमी आहेत. दिल्ली पेट्रोल हे 96.72 रूपये प्रति लीटर तर डिझेल हे 89.62 रूपये प्रति लीटर इतके आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रूपये प्रति लीटर आणि डिझेल हे 94.24 रूपये प्रति लीटर आहे. तर कोलकाता येथे पेट्रोल हे 106.03 रूपये आणि डिझेल 92.76 रूपये प्रति लीटर इतके आहे.
हेही वाचा - Gold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर
आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे हालचाल?
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर कच्चा तेलाच्या (Crude Oil) किमतींवरही परिणाम झाला. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही बरीचशी स्थिरता दिसते आहे. या युद्धामुळे आर्थिक घडामोडींमध्येही उलथापालथ झाली होती. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याचा परिणाम म्हणून या वर्षी जगाला आर्थिक मंदीलाही (Recession) सामोरे जावे लागले अशी परिस्थिती दिसते आहे. काही तज्ञांनी त्याच्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. त्यातून येत्या काळात बॅंकिंग संकट (Banking Crisis) उभं राहिल असं मतं आरबीआयचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी केले आहे.