Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव (Today Gold Price) वाढायला लागले होते त्यामुळे ग्राहकांसाठी चिंतेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता सोन्याचे भाव (Golda Price Today) हे बरेच घसरायला लागले आहेत. आज सोन्याच्या भावात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी सध्या चांगल्या खरेदीची संधी निर्माण झाली आहे. काल 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 60,870 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते.
तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 55, 800 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावरही सोन्याचे भाव हे वाढलेले दिसत होते. त्यानंतर सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (Gold price today 8th April 2023 gold price remained unchanged today see the latest rates in your city)
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, गेल्या दहा दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,311 रूपये प्रतितोळा इतके होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55, 286 रूपये इतके होते. गेल्या महिन्याभरात 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,060 रूपये प्रतितोळा इतके होते तर 22 कॅरेट सोनं हे 55,055 प्रति 10 ग्रॅम इतके होते.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणात उलाढाल होताना दिसते आहे. डॉलर इंडेक्सही (Dollar Index) घसरताना दिसतो आहे त्याचसोबत येत्या काही काळात यामध्ये अजून मोठी घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातून महागाईच्या विळख्यात जग असताना मध्यवर्ती बॅंका या मोठ्या प्रमाणात रेपो रेट (Repo Rate) वाढवताना दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकनंही काही काही दिवसांपासून हीच भुमिका ठेवली होती. त्याचबरोबर काही दिवसांपुर्वी आरबीआयनं ग्राहकांना रेपो रेटबद्दल दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचे भावही 1980 डॉलर व 1945 डॉलरच्या आसपास असेल.
हेही वाचा - Delhi Crime News: पाणीपुरीच्या वादात वृद्ध महिलेचा मृत्यू; दिल्लीतील विचित्र घटना चर्चेत
मुंबईमध्ये सोन्याच्या भावात मोठी चढउतार पाहायला मिळाली आहे. त्यातून मागील महिन्यात सोन्याच्या भावानं विक्रमी पातळी गाठली होती. 18 मार्च रोजी सोन्याचे भाव हे सर्वाधिक होते. 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 60,320 रूपये प्रतितोळा तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 55,300 रूपये प्रतितोळा इतके होते. तर त्याआधी बरोबर नऊ दिवसांपुर्वी सोन्याचे भाव हे 22 कॅरेटचे 50, 900 रूपये प्रतितोळा होते तर 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 55,530 रूपये प्रतितोळा इतके होते.