Petrol-Diesel Price on 12th April 2023 : सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असले तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत काहीसा  दिसाला देणारी बातमी आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज, 12 एप्रिल 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. आजही देशातील महानगरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून  दरात कोणताही बदल न झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायला जाणार असाल तर आजचे लेटेस्ट दर नक्की तपासून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्चा तेलाच्या किंमती जरी चढ-उतार पाहायल  मिळत असला तरी 24 तासात ब्रेंट क्रूड $1 पेक्षा जास्त महाग झाले आहे आणि $ 85 ची किंमतीचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी (12 एप्रिल 2023) जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर कच्चा तेलाच्या वाढत्या दराचा परिणाम झाला आहे. परिणामी काही शहरात पेट्रोल-डिझेल महाग झाल्याचे दिसून आले आहे. 


वाचा: उष्माघाताचा पहिला बळी, शेतात काम करताना शेतमजुराचा मृत्यू


यामध्ये नोएडा येथे पेट्रोल 6 पैशांनी महागले असून ते 97.00 रुपये प्रति लीटरने विकले जाणार आहे. तर डिझेल 5 पैशांनी वाढून 90.16 रुपये प्रति लिटरवर आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 13 पैशांनी महागले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्येही पेट्रोल 5 पैशांनी महागून 96.62 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.81 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याआधी मे 2022 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ₹ 8 प्रति लिटर आणि ₹ 6 प्रति लिटरने कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात अद्याप स्थिरता आहे. तर यापूर्वी दर 15 दिवसांनी इंधनाचे दर सुधारले जात होते. 2014 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले. 2017 पर्यंत, इंधनाची किंमत दररोज अद्यतनित केली जाते. 


शहर  पेट्रोल (रु/लिटर)  डिझेल (रु/लिटर)
मुंबई  106.31  94.27
नागपूर 106.04 92.59
पुणे  105.84 92.36
कोल्हापूर  106.47 93.01
औरंगाबाद 108 95.96
परभणी  109.45 95.81
नाशिक 106.77 93.27
दिल्ली  96.72  89.62
कोलकाता  106.03  92.76
चेन्नई  102.63  94.24

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.