सलग पाचव्या दिवशी वाढल्या पेट्रोलच्या किंमती, जाणून घ्या आजचे दर
पेट्रोलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. तर डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी कोणता बदल पहायला मिळाला नाही. देशाती राजधानी दिल्लीमध्ये साधारण दीड महिन्यानंतर पेट्रोलचे दर ७४ रुपये प्रति लीटर पार गेले. दिल्लीमध्ये पेट्रोल ७४.०५ रुपये प्रति लीटर झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती स्थिर होत्या. ब्रेंट क्रूडचा दर सलग दोन महिने वाढलेला आहे.
सलग पाचव्या दिवशी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलच्या दरात १६ पैसे प्रति लीटर इतकी वाढ झाली. डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी कोणताच बदल झाला नाही.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये पेट्रोल ७९.७१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६९.०१ रुपये प्रति लीटर आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल ७४.०५ रुपये, ७६.७४ रुपये आणि ७६.९७ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल अनुक्रमे ६५.७९ रुपये, ६८.२० रुपये आणि ६९.५४ रुपये प्रति लीटर आहे.