Petrol-Diesel Price Today 14th october : कच्च्या तेलाच्या (crude oil rate) दरात सतत अस्थिरता असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी गेल्या काही दिवसांत सांगितले होते की, सरकार दर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधन (ATF) वर आकारण्यात आलेल्या नवीन कराचा आढावा घेणार. (Petrol-Diesel Price Today Update)


क्रूडची घसरण सुरूच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या तेलाच्या (crude oil rate) किमती आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. 22 मे रोजी तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. शुक्रवारी (14 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 88.80 आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 94.35 पर्यंत घसरली. यापूर्वी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता. (petrol diesel rate update)


आजचे दर काय आहेत?(Petrol-Diesel Price)


- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


वाचा: भारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय 


तुमच्या शहरातील दर कसे तपासायचे?


पेट्रोल आणि डिझेलचे लेटेस्ट दर तपासण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे (SMS) दर तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP <डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. एचपीसीएल (HPCL) ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करा.