Petrol Price Today : पेट्रोलच्या दराने पार केली शंभरी
पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक
मुंबई : पेट्रोल, डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर दररोज नवनवे शिखर गाठत आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ८६ रुपये आहेत तर मुंबईत पेट्रोलचे दर हे ९३ रुपये इतके आहेत. कोलकातामध्ये डिझेलचे दर ८० रुपये आहेत. दिल्लीत दररोज पेट्रोल आपल्या किंमती उंची गाठत आहे. दिल्लीत दररोज एक दोन दिवसांत डिझेलचे दर ७७ रुपयांच्या पार झाले आहेत.
दिल्लीपेक्षा इतर मेट्रो शहरात पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ९२.८६ रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकतामध्ये पेट्रोलचा दर ८७.६९ रुपये तर चेन्नईत हा दर ८८.८२ रुपये प्रती लीटर आहे.
4 मेट्रो शहरात पेट्रोलचे दर
शहर कालचा दर आजचा दर
दिल्ली ८६.०५ ८६.३०
मुंबई ९२.६२ ९२.८६
कोलकाता ८७.४५ ८७.६९
चेन्नई ८८.६० ८८.८२
4 मेट्रो शहरात डिझेलचे दर
शहर कालचा दर आजचा दर
दिल्ली ७६.२३ ७६.४८
मुंबई ८३.०३ ८३.३०
कोलकाता ७९.८३ ८०.०८
चेन्नई ८१.४७ ८१.७१
श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर १०१ रुपये
देशातील चार मेट्रो शहराच्या तुलनेत राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. सामान्य पेट्रोलचा दर IOC वेबसाइटच्या माहितीनुसार ९८.४० रुपये प्रती लीटर आहे. एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचा दर १०१.१५ रुपये प्रती लीटर आहे. राजस्थानमध्ये जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.८६ रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर ८५.९४ रुपये आहे.