मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात. त्यामुळे आंतराष्ट्रीय घडामोडींवर तेल कंपन्यांचं लक्ष असतं. रशिया युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढल्याचं सांगण्यात येत आहे. पेट्रोलमागे प्रति लिटर 11 रुपयांचा तोटा, तर डिझेलमागे प्रति लिटर 25 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा सरकारी कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 111.21 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 95.69 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.08 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 95.56 रुपये, तर नाशिकमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.73 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 96.19 रुपये इतकं आहे.