महागाईचा भडका... या शहरात पेट्रोलने पार केला 110 रूपयांचा आकडा
मुंबईनंतर आता चेन्नईचा दुसऱ्या मेट्रोपॉलिटन समावेश झाला आहे.
मुंबई : मुंबईनंतर आता चेन्नईचा दुसऱ्या मेट्रोपॉलिटन समावेश झाला आहे. कारण चेन्नईमध्ये पेट्रोलने 100 रूपयांचा आकडा ओलांडला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचे दर 110 रूपयांवर पोहोचले आहेत. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक आहेत. श्रीगंगानगरमध्ये डिझेलसाठी तब्बल 102 रूपये मोजावे लागत आहेत. देशातील 332 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ झाली आहे.
पेट्रोलचे दर आज 35 पैशांनी तर डिझेल दर 28 पैशांनी वाढले आहेत. सांगायचं झालं तर 4 मेनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होण्यास सुरूवात झाली. पेट्रोल डिझेलच्या सतत वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचण भासत आहे.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 98.81
मुंबई 104.90
कोलकाता 98.64
चेन्नई 99.80
4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 88.18
मुंबई 96.72
कोलकाता 92.03
चेन्नई 93.72
दररोज ६ वाजता दर प्रसिद्ध
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
आपण दर या प्रकारे तपासू शकता
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती होऊ शकते. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी 9224992249 वर लिहून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.