EPFO Update : सरकारकडून खात्यात येणार 81 हजार रुपये, पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पीएफ खात्यात व्याजाची रक्कम (Pf Interest Rate) लवकरच जमा करणार आहे.
मुंबई : पीएफ खातेधारकांसाठी (PFO Account Holder) मोठी बातमी समोर आली आहे. पीएफओच्या 7 कोटी खातेधारकांना या महिन्याच्या अखेरीस गूडन्यूज मिळणार आहे. केंद्र सरकार 2022 या आर्थिक वर्षाच्या व्याजाची रक्कम पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करणार आहे. पीएफधारकांना यावेळेस 8.1 टक्के या दराने व्याज मिळणार आहे. पीएफ धारकांच्या खात्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत व्याजाची रक्कम येईल, असं म्हटलं जात आहे. या वर्षीचे व्याजदर हे गेल्या 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. (pf holder give intrest by 8 1 percent amount will be credited in account know details soon)
अशी करा व्याजाची आकडेमोड
- पीएफ खात्यात 10 लाख रुपये असल्यास 81 हजार रुपये व्याज मिळेल.
- 7 लाख रुपये असतील तर 56 हजार 700 रुपये व्याज मिळेल.
- 5 लाख रुपये असल्यास 40 हजार 500 रुपये व्याज येईल.
- 1 लाख रुपये असतील तर 8 हजार 100 रुपये व्याज येईल.
एका मिस्ड कॉलने जाणून घ्या बॅलेन्स
आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे, हे जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफोकडून मेसेजद्वारे तुमच्या खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल. मात्र यासाठी यूएएन नंबरसह पॅन-आधार लिंक असायला हवं.