मुंबई : दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याची जोरदार तयारी आधीपासूनच केली जाते. घरी फराळ, गोडधोड बनवण्यापासून ते नवे कपडे खरेदी करण्यात सारेजण व्यस्त असतात. पण दिवाळीची खरेदी करताना तुमच्याकडून कळतनकळत प्रदूषणात भर घातली जाते याबद्दल तुम्हाला माहितेय का ? एखादी वस्तू आवडली तर आपण लगेच त्याची किंमत मोजून खरेदी करतो. पण असं करत असताना अनेकदा त्या वस्तूमुळे पर्यावरणाची हानी तर होणार नाही ना ? हा विचारही करत नाही. त्यामुळे आपल्या समजदारी दाखविण्याने पर्यावरणाची हानी होणं आपण टाळू शकतो... याबद्दल आपण जाणून घेऊया...


नो प्लास्टिक  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दुकानदार आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या देतात आणि आपणही त्या न काही विचारता घेतो. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याचे ते नष्ट करणे कठीण होते. पर्यावरण संरक्षणात छोटसं योगदान देण्यासाठी आपण कापडी किंवा जूटच्या पिशव्यांचा वापर करण्याची सवय लावू शकतो.


पेपर वापरा 


गिफ्ट रॅप करण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यासाठी ग्रीन फॅब्रिकपासून बनलेल्या रॅपरचा उपयोग करा किंवा ब्राऊन बॅगचा वापरही तुम्ही करु शकता. यासाठी तुम्हाला चार्ट पेपर, डिझाइन आणि पॅटर्नसाठी घरातील कोणत्याही कलात्मक सदस्याची मदत घ्यावी लागेल.


वीज वाचवा 


एलईडी लाइटच्या वापराने वीज वाचण्यास मदत होते.  या दिवाळीत तुम्ही एलईडी स्ट्रीप खरेदी करु शकता. हा पर्याय योग्य आणि पर्यावरणास अनुकूल आहे. हे बनविण्यासाठी गॅलियम फोस्फाइडचा वापर केला जातो. यासाठी कमी वीज लागते आणि चांगला प्रकाशही मिळतो. या टीकाऊ देखील असतात.


फटाक्यांपासून दूरच 


वायु प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांपासून लांब राहणंच योग्य असेल. दुसऱ्यांनीही प्रदूषण करणारे फटाके खरेदी करु नये यासाठीही तुम्ही आग्रही असायला हवं. फटाक्यांमधील विषारी वायू आरोग्यासाठी हानिकारक असतो. हा वायू हवेतील वातारणात एकरूप होतो आणि हवा प्रदूषित होते. ही दिवाळी सुरक्षित आणि आनंद देणारी साजरी करुया.


अन्न वाचवा 


दिवाळी आनंद आणि उत्साहाचा सण आहे. सणासुदीतही मोठ्या प्रमाणात खाण्याचे पदार्थ टाकून दिले जातात. अन्न वाया न घालवूनही आपण पर्यावरण रक्षणास मदत करु शकतो.


गरजूंसोबत दिवाळी 


गरीब मुलं आणि त्यांच्या परिवाराला मिठाई आणि कपडे वाटू शकता. यामुळे केवळ तुमचीच नाही तर अनेक घरात आनंदाची दिवाळी साजरी होईल.