अबूधाबीमध्ये राजमहलात आमंत्रित केले जाणारे मोदी पहिले परदेशी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे राजा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली.
अबूधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे राजा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली.
मोदी बनले पहिले विदेशी नेते
दोन्ही देशांमध्ये ५ महत्त्वाच्या मुद्द्यावर करार झाले. ज्यामध्ये इंडियन ऑईलचं नेतृत्व करणाऱ्या कंपनीला कच्चा तेलामध्ये १० टक्के भाग देण्याचा करार देखील झाला. मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजमहलामध्ये आमंत्रित केलं. पंतप्रधान मोदी अबूधाबीमधील शाही घरात आमंत्रित केले जाणारे पहिले परदेशी नेते बनले आहेत.
मोदींचं जोरदार स्वागत
पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. एयरपोर्टवर अबूधाबीचे राजा आणि शाही परिवाराचे इतर सदस्य उपस्थित होते. त्यांनी मोदींचं जोरदार स्वागत केलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मोदींनी एयरपोर्टवर स्वागतासाठी मोहम्मद नाहयान यांना धन्यवाद केलं. त्यांनी म्हटलं की, भारत आणि संयुक्त अरब अमीरात (UAE)च्या संबंधांवर यामुळे सकारात्मक परिणाम दिसतील. युएईचे लष्कराचे उपकमांडर मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट केलं की, 'आम्ही आमच्या देशात अतिथी आणि मोल्यवान मित्र भारताचे पंतप्रधानम नरेंद्र मोदी यांचं यूएईमध्ये स्वागत करतो'
भारतीयांचं केलं कौतूक
नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांची यूएईचा हा दुसरा दौरा आहे. शनिवारी संध्याकाळी जायद यांच्यासोबत राजमहलात एक प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. मोदी ऑगस्ट 2015 मध्ये पहिल्यांदा युएई दौऱ्यावर गेले होते. राजांनी यूएई सारख्या आधुनिक देशाच्या निर्माणात भारतीय कामगारांच्या योगदानाचं कौतूक केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं की, प्रतिनिधी स्तरावरील चर्चेच्या आधी पंतप्रधान मोदी आणि अबू धाबीचे राजा यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. अबूधाबीनंतर पंतप्रधान मोदी ओमानला जाणार आहेत.