नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रम्हपुत्रेची उपनदी ढोला-सादियावर देशातला सर्वात जास्त लांबीचा पूल उभारण्यात आलाय. हा पूल पंतप्रधानांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

२ हजार ५६ कोटी रुपये खर्चून हा ९.१५ किलोमीटरचा पूल उभारण्यात आलाय. आसाम आणि अरुणाचलप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही राज्यातलं अंतर तब्बल १६५ किलोमीटरनं कमी होणार आहे.


शिवाय, डोंगाराळ राज्यातला प्रवास अवधी सुमारे सहा तासांनी कमी होणार आहे. या पुलामुळे अरुणाचल प्रदेशच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.


पुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, परिवहन आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवल यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.