मुंबई :  देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत 'स्वयंम संचारबंदी' करण्याचे आवाहन जनतेला केले होते. आज संपूर्ण देशातील नागरिकांनी  जनता कर्फ्यूला मोठ्या संख्येंने प्रतिसाद दिला. त्यामुळे मोदींनी देशातील जनतेचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी 'जनता कर्फ्यू' पाठोपाठ आता जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, 'हा नाद धन्यवादाचा नाद आहे. त्याचबरोब एका मोठ्या युद्धाचीही सुरूवात आहे आहे.' त्याचप्रमाणे  या मोठ्या युद्धात आपण बंधनात बांधून घेऊयात असे आवाहन यावेळेस त्यांनी देशातील जनतेला केले आहे. तर आज सकाळी सुरूवात झालेला  'जनता कर्फ्यू' उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत कायम असणार आहे. 


हा कर्फ्यु म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लादून घेण्यात आलेला कर्फ्यु असेल. हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे क्रेंद्र आणि राज्य सरकार कडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहे.  विषाणूचा  फैलाव अधिक होवू नये म्हणून स्वयं शिस्त पाळण्याचे सतत सांगण्यात येत आहे.