लखनऊ : बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरातींवर ३०४४ कोटी रूपये खर्च केल्याचा दावा केला आहे. जाहीरातींवर खर्च होणारा पैसा उत्तर प्रदेशसारख्या मागासवर्गीय राज्यातील प्रत्येक खेड्यात शिक्षण व आरोग्य सेवा पुरविण्याकरिता खर्च केले जाऊ शकतात परंतु मोदींना कोट्यवधी रूपये केवळ  जाहीरातिंवर उधळले असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी सध्या विकासकामांच्या उद्धटनांमध्ये व्यस्त आहेत. हा जनतेचा पैसा मागास राज्यातील गावात शिक्षण आणि चांगले आरोग्य देण्यासाठी वापरला जाऊ शकत होता. परंतु मोदींना हा पैसा सामाजिक कल्याणासाठी वापरण्यापेक्षा भाजपाच्या जाहीरातिंवर पैसे खर्च करणे अधिक गरजेचे वाटत असल्याचे ट्विट केले आहे. 



भाजप सरकारचे अपयश झाकोळण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून सध्या अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून गरिबी आणि बेरोजगारी या अतिमहत्त्वाच्या मुद्यांची ऐन निवडणूकीच्या दिवसांत चर्चा होणार नाही. पण अशा वेळी जनतेने सतर्क राहणे अतिशय गरजेचे असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.