नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जवानांना आदरांजली वाहिली. अमर जवान ज्योति येथे त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय. या सोहळ्याला १० देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या परेडमध्ये २३ राज्यांचे चित्ररथ सादर केले जाणार आहेत. 



गूगलचं डूडलचा सलाम


यामध्ये विविध राज्यांचा जीवंत रंग आणि त्यांची सांस्कृतिक समृद्धी दर्शवण्यात आलीय. डूडलच्या मुख्य भागात देशाचे शिल्प, संगीत आणि पारंपरिक प्रथांचं प्रतीक दर्शवण्यात आलंय. यामध्ये एक व्यक्ती प्राचीन संगीत वादययंत्रासोबतही दिसतोय. या डूडलमध्ये चक्रही दिसतंय. चक्र भारताच्या इतिहासातिल एक महत्त्वपूर्ण प्रतिक आहे.


तसंच या डूडलमध्ये आसामच्या बिहू नृत्याचीही झलक दिसतेय. यामध्ये हत्तीही दिसतोय. राजेशाही हत्ती हे आनंदाचं प्रतिक मानलं जातं. इतकंच नाही तर या डूडलमध्ये मुघल वास्तुकलेचा एक नमुनाही सादर करण्यात आलाय. समस्त मुघल वास्तुकलांचं स्मरण या माध्यमातून करण्यात आलंय.