नवी दिल्ली : कोरोना वायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने सार्क देशांच्या प्रमुखांनी नुकतीच व्हिडीओ कॉन्फरंसिंग करुन यासाठीच्या रणनीतीवर चर्चा केली. एकत्र येऊन कोरोनाशी लढावे लागले. कोरोनाला घाबरण्याचे कारण नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. १४०० भारतीयांना विदेशातून स्वगृही आणण्यात आले असून त्यांची तपासणी सुरु आहे. 



जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथीचा आजार घोषित केला आहे. सार्क देशांमध्ये यासंदर्भातीस १५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांच्या सहाय्याने याच्याशी लढण्यास सोपे जाईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. कोरोनाशी लढण्यासाठी सार्क देशांतकडून निधी उभारला जाईल. या निधीमध्ये १ कोटी डॉलर इतका निधी भारतातर्फे दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. यातून उपकरणे खरेदी केली जातील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.