नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान आता ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे भारतीय ठरले आहेत. ट्विटरवर मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या ५१ टक्क्यांनी वाढली आहे. 


फॉलोअर्स वाढले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरनुसार गेल्या वर्षभरात जीएसटी, मन की बात, राष्ट्रपती निवडणूक आणि नोटबंदीचे हॅशटॅग वर्षभर चालल्यानंतरही पंतप्रधनांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ५१ टक्क्यांनी वाढली आहे. 


३७.५ कोटी फॉलोअर्स 


याचा अर्थ पंतप्रधानांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ३७.५ कोटी आहे. 



 


'बीग बी' दुसऱ्या नंबरवर


पंतप्रधान मोदींनंतर भारतात सर्वात जास्त अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर फॉलोअर्स आहेत. 'बीग बी' यांना ट्विटरवर ३१.५ कोटी जण फॉलो करतात. 


'बीग बीं' नंतर 'बादशाह'


तिसरा नंबर बादशाह शाहरूख खान याचा लागतो. ३०.९ कोटी जण शाहरूख खानला ट्विटरवर फॉलो करतात. 


सल्लूचे  २८.५ कोटी फॉलोअर्स 


त्यानंतर सलमान खानला २८.५ कोटीजण फॉलो करतात आणि पीएमओ इंडिया ला २३ कोटीजण फॉलो करतात. 


अक्षयचे २२.८ कोटी फॉलोअर्स 


आमिर खानला मागे टाकत अक्षय कुमार सहाव्या स्थानी पोहोचला आहे. अक्षयला २२.८ कोटीजण फॉलो करतात.


सचिन आणि विराटही टॉप १० मध्ये 


सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली टॉप १० मध्ये आहेत.