या बँक ग्राहकांनी ATMमधून ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास द्यावं लागणार शुल्क
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून एका महिन्याला ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. हा नवा नियम ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे.
सध्याच्या स्थितीत पीएनबी ग्राहकांना एटीएमच्या माध्यमातून महिन्याला कितीही व्यवहार केल्यास शुल्क द्यावे लागत नाही. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून हा नवा नियम लागू होणार असल्याने ही सुविधा बंद होणार आहे.
या नव्या नियमासंदर्भात बँकेने म्हटले की, सेव्हिंग अकाऊंट असलेल्या खातेधारकांनी ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यांना प्रत्येक व्यवहाराला १० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मग, त्यांनी केवळ पीएनबी बँकेच्या एटीएमचा वापर केला तरी हा नियम लागू असणार आहे.