नवी दिल्ली : दो बूंद जिंदगी के पोलिओ मुक्त मोहीम धोक्यात आलीय. भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी याला धक्का लागण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस आढळल्याने एकच खळबळ उडालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिओ व्हायरस आढळल्याने देशावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे.  याप्रकरणी बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून कंपनीच्या संचालकानाही अटक करण्यात आलीय.


बायोमेड कंपनीची लस उत्तरप्रदेश राज्यासह महाराष्ट्रातही वापरली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने चिंता व्यक्त केली जातंय. ही माहिती उघड झाल्यानंतर लसींचा पुरवठा थांबविण्यात आलाय.