गोव्यात मगोपचे राजकारणात महत्व कायम राहील - ढवळीकर
`गोव्याच्या राजकारणाच्या इतिहासात म. गो. पक्षाचे महत्व कायमच अधोरेखित राहील आहे.`
पणजी : गोव्याच्या राजकारणाच्या इतिहासात म. गो. पक्षाचे महत्व कायमच अधोरेखित राहील आहे. त्यामुळे भाजपला मगोपचे अस्तित्व संपवण सोपे नाही. उलट जे आमदार पक्ष सोडून जात आहेत त्यांचेच भवितव्य टांगणीला लागेल, असा टोला गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. फुटीर आमदारांना देण्यात आलेल्या ऑफर बद्दल मला काही माहीत नाही, मात्र हे सर्व गंभीर आहे. नितीमूल्य भाजपने संपवली, असा आरोप त्यांनी केला.
गोव्यातील भाजप सरकारला वारंवार सरकार कोसळवण्याची धमकी देत असल्यानेच गोवा फॉरवर्डच्या तिघा मंत्र्यांना वगळण्यात आले, असा आरोप गोवा विधानसभेतील भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिल्याने भाजपतील कोणीही निष्ठावंत नाराज नाही, असेही लोबो यांनी सांगितले.
काँग्रेस आमदारांचा गट करून भाजप मध्ये विलीन करण्यात ज्यांनी महत्वाची भुमिका बजावली त्या बाबुश मोन्सेरात यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. बाबुश यांच्या पत्नी जेनिफर या ताळगावच्या आमदार आहेत. मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी असावी यासाठी जेनिफर यांच्या नावाचा बाबुश यांनी आग्रह धरल्याचे बोलले जात आहे.