Fresh Air for 2500 Rupees Per Hour : असं म्हणतात की कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल ते प्रत्येक काम चांगलं. अवैध मार्गाने कमावलेला पैसा याला अपवाद आहे. तुमच्याकडे मेहनत करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर तुमच्यासमोर पैसे कमवण्याचेही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आज इंटरनेट (Internet) युगात तर आपण घरबसल्याही पैसे कमवू शकतो. फक्त विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्याने लढवली आयडीयाची कल्पना
कोरोना (Corona) महामारीत ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यातूनच धडा घेत एका शेतकऱ्याने पैसे कमण्याची अनोख शक्कल लढवली. त्याने आपल्या शेतात पर्यटकांना शुद्ध हवा (Fresh Air) घेण्याचा पर्याय दिला आणि यासाठी त्याने चक्क पैसे आकारायला सुरुवात केली. 


शहर असो की ग्रामीण भाग सध्या हवेचा स्तर प्रचडं घसरला आहे. शहरात सर्वाधिक अशुद्ध हवेची नोंद झाली आहे. त्याचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आहे. निसर्ग नष्ट करुन सिमेंटच्या जंगलात वाढ होत आहे, याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही झाला आहे. परिणामी लोकांना शुद्ध हवा मिळेनाशी झाली आहे. हीच गोष्ट हेरून एका शेतकऱ्याला शुद्ध हवेची कल्पनी सुचली.


शुद्ध हवेचा व्यवसाय
थायलंडमध्ये (Thailand) राहाणाऱ्या 52 वर्षांच्या या शेतकऱ्याकडे अनेक एकर शेती आहे. या जमिनीत तो वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो. याशिवाय त्याने आपल्या शेतात कॅम्पिंग एरिया तयार केला आहे. देशातील सर्ता शुद्ध आणि ताजी हवा आपल्या शेतात मिळत असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी अनेक पर्यटक या शेतकऱ्याच्या शेतात येतात. यातून त्याने आता पैसे कमवायलाही सुरुवात केली आहे. एक तास शुद्ध हवा घेण्याचे तो अडीच हजार रुपये आकारतो. या एका तासाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला जेवणही मोफत दिलं जातं. 


कल्पना ठरतेय सुपरहिट
एशियन लाइफ सोशल वेलफेयर डेव्हलपमेंट ऑर्गेनाइजेशनने (Asian Life Social Welfare Development Organization) दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याची कल्पना चांगलीच सुपरहिट ठरत आहे. तो शेतकरी आपल्या शेतात येणाऱ्या लहान मुलं आणि अपंगांना पैसे आकारत नाही. इतकंच नाही तर इतर शहरातून येणाऱ्या लोकांसाठी तो वेगळे पैसेही आकारत नाही.