Mukesh Ambani Buy New Range Rover Cars : नुकताच देशाचा 2023 - 24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला आणि यानंतर देशातील दोन श्रीमंत व्यक्तींनी सर्वांच्याच नजरा वळवल्या. एकिकडे (Gauam Adani) गौतम अदानी यांचा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द होणार असल्याची माहिती समोर आली, आणि दुसरीकडे मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) झालेल्या नफ्यानं लक्ष वेधलं. त्यातच आणखी एक विषय बराच चर्चेत राहिला. तो म्हणजे (Reliance Group) रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पाहुण्यांचा. आता या नव्हा पाहुण्या कोण? असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर या पाहुण्या म्हणजे अंबानींच्या दोन नव्याकोऱ्या कार्स. 


हेसुद्धा वाचा : Adani Group ला तब्बल 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन, सांगितली ही मोठी गोष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हल्लीच मुकेश अंबानींच्या कार्सच्या ताफ्यात रेंज रोव्हरचं न्यू जेनरेशन (Range Rover SUV) आलं आहे. त्यांनी एकाच प्रकारच्या दोन कार्स खरेदी केल्या आहेत (Mukesh Ambani Car Collection). एका (You Tube) युट्यूब चॅनलच्या व्हिडीओमध्ये अंबानींच्या या कार आपल्याला पाहता येत आहेत. मुंबईतील वाहतुक कोंडीमध्येच SUVs चा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या या दोन्ही एसयूव्हीज 3.0 LWB SE डिझेल व्हेरिएंट आहेत. या कारच्या किमतीबाबत सांगावं तर, प्रत्येक कारची किंमत साधारण 2.57 कोटी रुपये इतकी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही कारची नोंदणी Reliance Industries Limited च्या नावे करण्यात आली आहे. 


कारचं इंजिन दमदार 


3.0 LWB SE रेंज रोव्हरचं हे मिड स्पेक एसई व्हेरिएंटमधील लाँग व्हीलबेस व्हर्जन आहे. यामध्ये 3.0 लीटर 6 सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. ज्यातून 350 पीएस पॉवर आणि 700 एनएमनं टॉर्क आऊटपूट दिलं जातं. या स्पेशन एडिशन कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 4 व्हील ड्राईव्ह सिस्टीम दिली जात आहे. या एसयूव्हीमध्ये 3.0 लीटर डिझेलशिवाय 3.0 लीटर पेट्रोल आणि 4.4 लीटर पेट्रोलचेही पर्याय उपलब्ध आहेत. 


मुकेश अंबांनीकडे इतर कोणत्या कारचं कलेक्शन? 


अंबानींच्या कार्सच्या ताफ्यात रेंज रोव्हर सर्रास दिसते. पण, या नव्या कार 4th जेनरेशन मॉडल आहेत. याशिवाय त्यांच्याकडे लँड रोव्हर डिस्कव्हरी, मर्सिडीज एमएमजी जी 63, फोर्ड एंजेवर आणि एमजी ग्लॉस्टर अशाही लक्झरी एसयूव्हीज आहेत.